धाकधूक वाढली! थोड्याच वेळात दहावीचा निकाल, ‘येथे’ करा चेक

आज अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण थोड्याच वेळात दहावीच्या परिक्षेचा निकाल(results) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. एसएससी बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल(results) जाहीर करणार आहेत. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना आज निकाल पाहता येणार आहे.

नागपूर विभागामध्ये 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर सर्वाधिक विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील होते. तेथून 58 हजार 495 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यभरातील इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं, आता दहावीच्या निकालात कोण आघाडीवर राहते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी निकाल कुठे पाहावा?

  1. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
  2. https://results.digilocker.gov.in
  3. https://sscresult.mahahsscboard.in
  4. http://sscresult.mkcl.org

वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळांवर क्लिक करून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तसेच गुणपत्रिका देखील डाऊनलोड करता येणार आहे. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था