१३ वर्षांच्या मुलीवर १२ जणांकडून वारंवार बलात्कार, पण पीडितेच्या आईलाही केली अटक

चेन्नईमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर १२ जणांनी सामूहिक बलात्कार (victim’s)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नईच्या पल्लवरमजवळ ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपींमध्ये ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईला देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे चेन्नई हादरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या पल्लवरमजवळ १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर १२ जणांनी वारंवार बलात्कार केला. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आईने तिला चेंगलपट्टू येथील सरकारी रुग्णालयात नेले. मुलीची तपासणी केल्यावर डॉक्टरांना मोठा धक्का बसला. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पल्लवरम पोलिसांना घटनेची माहिती दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पुराव्याआधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि सर्वच्या सर्व १२ आरोपींना अटक केली. (victim’s)आरोपींनीमध्ये ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला अटक केली आहे. या महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली. पीडित मुलगी घरामध्ये एकटी राहत होती. तिचे आई-वडील कामासाठी घराबाहेर जायचे. यावेळी एक अल्पवयीन आरोपी तिच्या घरी पाण्याची बाटली देण्यासाठी येत होता. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने आधी तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला पण ती गप्प राहिली. यामुळे आरोपी पीडित मुलीसोबत वारंवार घृणास्पद कृत्य करत राहिला. (victim’s) नंतर आरोपी त्याच्या मित्राला पीडित मुलीच्या घरी घेऊन आला. या दोघांनी देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींची संख्या वाढत गेली आणि १२ जणांनी मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीची आई याघटनेकडे दुर्लक्ष करत राहिली. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था