खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही दणकून आपटली

आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईत सोन्याच्या(silver price) भावात वाढ झाल्याने खरेदीदारांना टेन्शन आले होते. अशातच आज सलग तीन आठवड्यानंतर धातुंच्या किंमती नरमल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या(silver price) किंमतीनी विक्रमी उच्चांक गाठला होता. मागच्या काही दिवसात सोन्याचा भाव हा २४०० डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळला होता. यामुळे भारतीय बाजारपेठेत सुद्धा सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या भावाने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. भू-राजकीय परिस्थिती, मध्यवर्ती बँकांचे कर्ज यामुळे किंमती वाढच होत्या. अशातच ग्राहकांना आज काही प्रमाणात खरेदीसाठी दिलासा मिळू शकतो. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या(silver price) सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६३० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,३१० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात १,५३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी ८३,००० रुपये मोजावे लागतील. तर आज चांदीच्या भावात २,५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) – ७२,१६० रुपये
  • पुणे (Gold Price in Pune) – ७२,१६० रुपये
  • नागपूर (Gold Rate in Nagpur) – ७२,१६० रुपये
  • नाशिक(Gold Price in Nashik) – ७२,१९० रुपये
  • ठाणे (Gold Rate in Thane) – ७२,१६० रुपये
  • अमरावती (Gold Price in Amravati) – ७२,१६० रुपये

हेही वाचा :

 उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका

‘ भारताविरुद्ध द्विपक्षीय सिरिजबद्दल पाकिस्तान बोर्डाच्या अध्यक्षांनी ठेवली अट

बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची