Google Meet मध्ये आलय ‘हे’ नवीन एआय फिचर

आजकाल व्हिडीओ कॉल,गुगल मीट, झूम मीटचा जमाना आहे.(Google Meet) लोक आपल्या प्रियजनांशी बोलण्यासाठी, ऑफिस मध्ये संपर्क साधण्यासाठी आणि अन्य बऱ्याच कामांसाठी गुगल मीट चा वापर करतात. अश्यात जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये तुमचे बॅकग्राऊंड चांगले नसेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर आता कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला मदत करु शकणार आहे. च्या मदतीने तुमची व्हिडीओ मीट प्लॅटफॉर्मवरचा तुमचा अनुभव सुधारायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

गुगल मीटमध्ये आता एक नवीन ‘बीट’ फीचर आले आहे. याचा वापर करून एआयच्या मदतीने यूजर कस्टम बॅकग्राउंड तयार करू शकतात. AI च्या मदतीने Google Meet मध्ये पार्श्वभूमी, फोटो तयार केला जाऊ शकतो. पण हे बीट फिचर आत्ता फक्त कॉम्प्युटरवर उपलब्ध आहे. हे फीचर अजून स्मार्टफोन्सवर लाँच करण्यात आलेले नाही. हे फिचर वापरण्यासाठी, वापरकर्त्याला Google Workspace लॅबमध्ये लॉगिन असणे आवश्यक आहे.

Google Meet वर AI वैशिष्ट्ये वापरून व्हिडिओ कॉल सुधारता येतात. पुढे जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया.

सर्व प्रथम, वापरकर्त्याला संगणकाच्या वेब ब्राउझरमध्ये Google Meet उघडावे लागेल. यानंतर तुम्हाला मीटिंगमध्ये सहभागी व्हावे लागेल किंवा तुमची नवीन मीटिंग सुरू करावी लागेल.

Google Meet उघडल्यानंतर, तुमच्या व्ह्यू विंडोमध्ये तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा. त्यानंतर मेनूवर जाऊन Apply Visual Effect वर क्लिक करा.

Google Meet मध्ये, पार्श्वभूमी फोटोसाठी तुम्हाला थोडा कन्टेन्ट टाईप करावा लागेल. येथे वापरकर्त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की फोटो देखील वर्णनाप्रमाणेच असेल. त्यामुळे तुमचं क्रिएटिव्ह माईंड वापरून कसा बॅकग्राऊंड हवा त्याबद्दल माहिती द्या.ज्यामध्ये तुम्ही समुद्रकिनारा,मोठा फ्लॅट,गार्डन असा पर्याय देखील निवडू शकता.

प्रॉम्प्ट बॉक्सच्या खाली स्टाईल निवडण्याचा पर्याय असेल, येथून तुम्हाला बॅकग्राउंड फोटोसाठी स्टाईल निवडावी लागेल. यात क्लासिक आणि आधुनिक समाविष्ट आहे. तुम्हाला जसे बॅकग्राऊंड हवे आहे त्याप्रमाने तुम्ही पर्याय निवडू शकता.

हेही वाचा :

IPL 2024 च्या Closing Ceremony मध्ये अमेरिकन बँडचा धुरळा

लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात लढले, आता शांतिगिरी महाराजांनी केली मोठी घोषणा…

प्रियांका चोप्राने सकाळी-सकाळी दाखवला ‘तो’ लूक; नेटकरी घायाळ