हातगाडी लावण्यावरून कोल्हापुरात एकाला भोसकलं; चाकूने सपासप वार

बिंदू चौक ते शिवाजी चौक मिरवणुकीचा दणदणाट सुरू असतानाच आराम कॉर्नर(Kolhapur) परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा दुसऱ्या एका तरुणाने चाकूने भोसकून खून केला. खुनाचा हा प्रकार मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. मृत झालेल्या तरुणाचे नाव इमरान मुजावर असून संशयित आरोपीचे नाव युसुफ असलमजीत आहे. आराम कॉर्नर येथे खाद्य विक्रीची गाडी लावण्याच्या वादातून हा खून झाला असल्याचे समजते.

विसर्जन मिरवणुकीत खून होण्याची गेल्या काही वर्षातील ही तिसरी घटना आहे. 1985 च्या दरम्यान रंकाळ (Kolhapur) वेस परिसरात गुंड्या लाड याचा त्याचा भाऊ माऊ लाड यानेच चाकूचे सभासप वार करून खून केला होता. दुसरी घटना ही श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत घडली होती. निवडणुकीत साईराज जगताप याची हत्या तर सम्राट कोराने याच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता.

त्यानंतरची मंगळवारी घडलेली इमरान मुजावर खूनाची तिसरी घटना घडली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी आणि मृत हे दोघेही त्याच परिसरात राहणारे आहेत. मंगळवारी रात्री सीपीआर रुग्णालयात मुजावरच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी केली होती. आराम कॉर्नर परिसरातही खळबळ उडाली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला जागेवरच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा:

Zomato ला मोठा झटका! कंपनीला 177000000 कोटींची नोटीस

‘हे माझं मंदिर…’अरिजित सिंहच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, स्टेजवर घडला विचित्र प्रकार Watch Video

‘लाडक्या भावांसाठी मटक्याचे दुकान’ ठाकरे गटाकडून VIDEO शेअर शिंदेचा ‘स्टंटबाज आमदार’ लक्ष्य