आजपासून दिवाळी सुरु होत असून राजकीय (political)नेते एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण त्याचबरोबर सूचना देखील दिल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी काही दिवसांपूर्वी जवळपास ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, सरकारने पॅकेज जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत राज्य सरकारला सोडणार नाही(political). रकारची फसवा फसवी सुरू आहे. मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना मदत करा असे आवाहन देखील केले. ते म्हणाले की, मी मुंबईत असलो तरी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क सुरु असतो. मी दिवाळीनंतर येणार असलो, तरी तालुका पातळीवर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे पाहायला हवं. तसेच ती मदत मिळवून देण्याचे काम आपल्या शिवसैनिकांनी करायचं आहे. नाहीतर नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग, असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाले आहेत.

त्याचबरोबर दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घोषणेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली. सरकारने जे साडेतीन लाख जाहीर केलेत, त्यातले पैसे शेतकऱ्यांना नंतर द्या, पण यातले एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. त्यांचे कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आहे,” असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
हेही वाचा :
क्रिकेटचा नवा फॉरमॅट लाँच होणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम..
पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?