किडनी (kidney)ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची अवयव आहे. मूत्रपिंड फक्त रक्त शुद्ध करण्याचे काम करत नाही, तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते, तेव्हा ती योग्य प्रकारे काम करत नाही आणि शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास आजार अधिक गंभीर होऊ शकतो, कारण किडनीचे आजार हळूहळू वाढतात आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं सामान्य वाटतात.

किडनी खराब(kidney) झाल्याचे मुख्य लक्षणं पुढीलप्रमाणे सांगतात. वारंवार येणारा थकवा, शरीरात सतत कमजोरी जाणवणे हे सुरुवातीचे लक्षण आहे. रक्त योग्य प्रकारे शुद्ध न झाल्यामुळे शरीरात विषारी घटक जमा होतात, ज्यामुळे व्यक्तीला नेहमी थकल्यासारखे वाटते. लघवीशी संबंधित समस्या, जसे की वारंवार लघवीला जाणे, जळजळ किंवा लघवीतून फेस तयार होणे, हेही किडनी खराब असल्याचे संकेत आहेत, आणि लघवीत रक्त आल्यास हे गंभीर लक्षण समजले जाते.
याशिवाय, चेहरा टापसणे, डोळ्यांच्या खाली सूज येणे, पाणी शरीरात जमा होणे यामुळे दिसणारी सूज, भूक मंदावणे, मळमळ किंवा उलटी येणे, त्वचा रुक्ष आणि खाज येणे, तसेच श्वास फुलणे ही लक्षणे देखील किडनी खराब झाल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जर वरील लक्षणं दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा किडनीचे नुकसान वाढू शकते.

हेही वाचा :
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना
“भाजपमुळेच महागाईचा…”; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका
अवघ्या 2000 रुपयांच्या नियमीत बचतीत तुम्ही पण व्हा करोडपती