शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत(health) गडबडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, येथील वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी प्रकृतीत बिघाड झाल्याचे आणि उपचार सुरु असल्याचे जाहीर केले होते, मात्र आता त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याचे समजते.

सध्याच्या परिस्थितीत संजय राऊत सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर आहेत. त्यांनी स्वतःच्या पत्रकाद्वारे सर्व मित्र, परिवार आणि कार्यकर्त्यांना माहिती देत नम्र विनंती केली होती की, प्रकृती गंभीर (health)असल्यामुळे काही काळ बाहेर पडणे आणि गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे शक्य नाही. त्यांनी आश्वासन दिले की, योग्य उपचारानंतर लवकरच ते ठणठणीत बरे होऊन नवीन वर्षात सर्वांशी भेटणार आहेत.
रुग्णालयात आज आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांतीसाठी जाणार आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील विविध नेत्यांनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना
“भाजपमुळेच महागाईचा…”; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका
अवघ्या 2000 रुपयांच्या नियमीत बचतीत तुम्ही पण व्हा करोडपती