पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर IPL 2025 बाबत BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ गोष्टी होणार बंद

मंगळवार 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मिरच्या पहलगाम भागात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर देशभरातून शोक आणि हल्लेखोरां विरोधात संताप व्यक्त होत असताना आता बीसीसीआयने(BCCI) देखील आयपीएलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून बुधवारी आयपीएल 2025 च्या सामन्यादरम्यान खेळाडू तसेच मॅच अधिकारी हातावर काळा बँड बांधून खेळतील. बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना राजीव गांधी स्टेडियमवर पार पडेल. बीसीसीआयने(BCCI) सामन्यापूर्वी या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडितांच्या आठवणीत एक मिनिटांचं मौन पाळण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आयपीएलने बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्यानंतर होणाऱ्या आतिशबाजीवर बंदी घातली आहे. यासह सामन्यादरम्यान चीयरलीडर्सना सुद्धा हटवण्याचा निर्णय घेतलाय.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवादी हल्लावर मंगळवारी पार्थिव पटेल, गौतम गंभीर, हरभजन सिंह, आकाश चोप्रा, शुभमन गिल, नमन धीर इत्यादी भारतीय क्रिकेटर्स व्यक्त झाले होते. तर आता विराट कोहलीने देखील या हल्ल्याचा निषेद करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना. या क्रूर कृत्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो आणि त्यांना न्याय मिळो अशी प्रार्थना’ असे म्हटले.

विराट कोहली वगळता टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सुद्धा यावर व्यक्त झाला होता. त्याने एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटले की, ”दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना याची किंमत चुकवावीच लागेल. भारत नक्कीच प्रहार करेल’.

हेही वाचा :

लष्कर ए तोयबाचा अधर्म ठार मारताना विचारला धर्म

सलग 14 दिवस रोज शिलाजीत खाल्ल्याने काय होईल? महिलांनी घ्यावं का?

उन्हाळ्याच्या हिटला करा बीट; घरीच बनवा झटपट ‘थंडगार मँगो लस्सी’