संपूर्ण शरीराच्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर (blood)पायांमध्ये अतिशय तीव्र वेदना वाढू लागतात. या वेदनांमुळे काहीवेळा उभे राहता येत नाही. जाणून घ्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे.

दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी शरीराला रक्ताची आवश्यकता असते. त्यासोबतच शरीरातील रक्त सर्वच अवयवांपर्यंत योग्य प्रमाणात पोहचणे सुद्धा तितकेच (blood)आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाची प्रक्रिया म्हणजे ब्लड सर्कुलेशन . शरीरात रक्त सर्वच अवयवांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्यास शरीरात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. पण काहीवेळा एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे किंवा मेंदूसंबंधित समस्या उद्भवल्यामुळे रक्तभिसरणात अनेक अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे शरीरसंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. याचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. धमण्यांमध्ये ब्लॉकेज होणे, डायबिटीस, नसांमध्ये ताण इत्यादी अनेक कारणामुळे शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
टाचा आणि पायांमध्ये सूज येणे:
रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांच्या टाचांमध्ये वेदना होतात. याशिवाय काहीवेळा पायांना सूज सुद्धा येते. रक्तभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे फ्लुइड टाच आणि पायांच्या टिश्यूजमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे काहीवेळा उभे राहिल्यानंतर पायांमध्ये अतिशय वेदना होतात. तसेच त्वचेवर बोटाने दाबल्यास खड्डे होतात. ही समस्या अतिशय सामान्य वाटते. हृदयाची कमजोरी, किडनीच्या समस्या किंवा नसांमध्ये वाढलेल्या कमजोरीमुळे पाय आणि टाचांमध्ये वेदना होतात.
पाय नेहमीच थंड राहतात:
बऱ्याचदा पायांना स्पर्श केल्यानंतर पाय अतिशय थंड वाटतात. रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पाय अतिशय थंड पडतात. पायांपर्यंत गरम रक्त व्यवस्थित न पोहचल्यामुळे पाय कायमच थंड राहतात. याला थायरॉइड किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे रक्तभिसरणात अडथळे झाल्यास शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
स्नायूंमध्ये वेदना:
रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास मांडी, पोटऱ्या किंवा तळपायात अचानक क्रॅम्प येऊन वेदना होतात. याशिवाय यूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि वेदना वाढू लागतात. स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
रक्तभिसरण सुधारण्यासाठी उपाय:
शरीराचे बिघडलेले रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. याशिवाय नियमित चालणे, स्विमिंग, सायकल चालवणे किंवा जॉगिंग इत्यादी सर्व व्यायाम प्रकार करावेत. यामुळे हृयद्याचे ठोके वाढतात आणि शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या आहारात ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे, धान्ये आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
हेही वाचा :
फटाके कोंबले तोंडात अन् असा लावला जाळ… पाहूनच आत्मा कापेल; Video Viral
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन…
सपना चौधरीच्या शोमध्ये राडा, खोलीत घुसून गोळ्या घालण्याची दिली धमकी…