निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; संजय राऊतांची बोचरी टीका
मुंबईमध्ये आज शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर(betel nut) सभा होणार आहे. या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या सभेनिमित्त राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या सभेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
“या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही सुपारीची(betel nut) दुकाने बंद होणार आहेत. मुंबईत, महाराष्ट्रात येऊन २०- २५ सभा घेत आहात. म्हणजे १० वर्षात तुम्ही काहीच काम केले नाही. महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या. पाय ठेऊ देणार नाही असं सांगितलं, त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच “तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय. स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमान वगेरे म्हणताय, आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणता. तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रुंच्या बरोबर व्यासपीठावर बसता, त्यांच्यावर कौतुकाची फुले उधळता. हे चित्र महाराष्ट्राला याची देही, याची डोळा पाहू द्या, म्हणूनच या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही सुपारीची दुकाने बंद होणार,” अशी बोचरी टीका राज ठाकरे यांच्यावर केली.
तसेच “आज इंडिया आघाडीचीही बीकेसी मैदानावर सभा होईल. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. तसेच उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल,” अशी माहितीही यावेळी संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा :
प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच प्रियकराला भोसकले
‘बॅटने मारेन..’ लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला – Video
‘अमिताभ बच्चन यांनी मला उचललं अन्…’; अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा