प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच प्रियकराला भोसकले
बेळगाव : प्रेम प्रकरणातून एका तरुणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत खून(find a boyfriend) करण्यात आल्याची घटना महांतेशनगरला काल (ता. १६) दुपारी घडली. इब्राहिम ऊर्फ शोयेब ख्वाजामैनोद्दिन चौस (रा. गुलझार गल्ली, न्यू गांधीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.
मुजमिल मैनोद्दिन सत्तीगिरी (रा. गुलाबशा गल्ली, गांधीनगर, बेळगाव) असे संशयिताचे(find a boyfriend) नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत इब्राहिम हा संशयित आरोपी सत्तीगेरी याच्या बहिणीवर प्रेम करायचा. इब्राहिम व त्याची बहीण आज (ता. १६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी अचानक महांतेशनगरला भुयारी मार्गाजवळ बंद पडली.
दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न करत असताना येथून संशयित सत्तीगेरी जात होता. त्याने इब्राहिम आणि बहिणीला एकत्र पाहिले. त्याला राग अनावर झाला. त्याने स्वतःजवळचे स्क्रू-ड्रायव्हर काढले आणि इब्राहिम यांच्यावर हल्ला केला. यात इब्राहिम यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, काल (ता. १६) दुपारी अडीच सुमारास त्याचा मृत्यू झाला. माळमारुती पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
लग्नाला नकार दिल्यानंतर प्रेयसीला महांतेशननगर येथून दुचाकीवरून घेऊन जात असताना रागाच्या भरात हल्ला करण्यात आला. स्क्रू डायव्हरच्या हल्ल्यामुळे पोटाला गंभीर दुखापत झाली आणि यातून रक्तस्त्राव झाला. वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तेथे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सत्तीगेरी याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची तपास करत आहेत. कांतेश लकप्पा शिवरायगोळ यांनी माळमारुती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इब्राहिम संशयितांच्या बहिणीवर प्रेम करायचा. याची कल्पना दोन्ही घरात होती. यामुळे प्रियकर इब्राहिमच्या घरच्यांनी सत्तीगेरी यांच्या घरी जाऊन लग्नासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सत्तीगेरी कुटुंबीयांनी नकार दिला.
हेही वाचा :
भुजबळांनी घेतली पुन्हा उद्धव यांची बाजू; राज ठाकरेंना म्हणाले…
‘अमिताभ बच्चन यांनी मला उचललं अन्…’; अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
‘बॅटने मारेन..’ लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला – Video