भारतीय यूजर्सला मोठा झटका, YouTube Premium 58 टक्क्यांनी महाग
देशात गेल्या काही वर्षांपासून YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला (sales plan)आहे. अनेकजण YouTube Premium च्या मदतीने देखील आपले दररोजचे काम करत आहे. जर तुम्ही देखील YouTube Premium वापरात असाल तर तुमच्या खर्च्यात वाढ होणार आहे. याच कारण म्हणजे Google ने भारतीय यूजर्ससाठी YouTube Premium प्लॅन महाग केला आहे.
माहितीनुसार, YouTube Premium प्लॅन(sales plan) भारतीय यूजर्ससाठी 58 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. कंपनीने स्टुडंट, फॅमिली आणि पर्सनल YouTube Premium च्या तिन्ही प्रकारच्या प्लॅनच्या किमती वाढल्या आहेत.
YouTube Premium स्टुडंट मासिक प्लॅनची सुरुवातीची किंमत 12.6 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आता यूजर्सला 79 रुपये नाही तर 89 रुपये मोजावे लागणार आहे. तर पर्सनल YouTube Premium साठी 149 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी या रिचार्जसाठी 129 रुपये होती. यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे YouTube Premium फॅमिली प्लॅनसाठी आता यूजर्सला 299 रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी या रिचार्जसाठी 189 रुपये मोजावे लागत होते. कंपनीच्या नवीन निर्णयानुसार या प्लॅनमध्ये 58 टक्क्यांनी किंमत वाढ करण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्लॅन नवीन आणि विद्यमान यूजर्ससाठी आहे. YouTube Premium मध्ये तुम्हाला जाहिरात फ्री, ऑफलाइन डाउनलोड प्लेबॅक हिस्ट्री आणि जाहिरात फ्री YouTube म्युजिक मिळतो.
हेही वाचा:
Infinix Zero 40 5G सिरीज आज होणार लाँच
‘दीपवीर’ चिमुकल्याचं स्वागत दणक्यात करणार! बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या घरात जाणार
सरकारी कार्यालयात घुसून भरदिवसा तलाठ्याची हत्या; डोळ्यात मिरचीपूड फेकून केला चाकूहल्ला