मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(news) कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ(news) आता सहा महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही यावेळी भाष्य केलं.

“लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये विरोधकांनी अल्पसंख्यांक समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं”, असा दावा सुनील तटकरे यांनी केला. “आपल्याला 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं. तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं. मात्र तसं केलं नाही. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होती.

मात्र ते बाकी पक्षात गेले नाहीत. ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राहिले. शरद पवार यांनी म्हटलं की छगन भुजबळ यांना मंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता. अजित पवार त्यावेळी नवखे होते, असं देखील सांगितलं. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की 1999 पासून अजित पवार मंत्री होते. ते 9 वर्ष मंत्री यासोबत ते खासदर होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा अजित पवार यांचा होता”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“शरद पवार आपल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार सोडलेला नाही”, असं सुनील तटकरे म्हणाले. “युतीच्या राजकारणात आपल्याला परभणीचे उमेदवार बदलावे लागले. अखेरच्या क्षणी आपल्याला काही उमेदवार घ्यावे लागले. आपण उमेदवार आयात केले असं नाही. कारण अर्चना पाटील राष्ट्रवादीत होत्या. उलट समोरच्या पक्षाने उमेदवार आयात केले”, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

“धीरज शर्मा, जम्मू कार्याध्यक्ष, युवकांचे पदाधिकारी आज आपल्यासोबत येत आहेत. सर्व राज्यात अजित दादांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येणारा वर्धापन दिन हा आपल्या पक्षासाठी पहिला नव्हे तर 25 वा वर्धापन दिन असेल. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखली हा वर्धापन दिन असेल. राज्यांतील लोकसभेचा अहवाल सर्वांनी पाठवावा. काय अडचणी आल्या त्या मांडव्या. विभागीय पातळीवर लवकरच अधिवेशनापूर्वी आपण मेळावे आयोजित करावेत. आता आपलं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षात ठेवा”, असे निर्देश सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा :

व्हॉट्सअपचा आलाय ‘मल्टि लॉगिन’ ऑप्शन…

लस्सी प्या आणि तंदरुस्त राहा; आरोग्यावर होणारे भन्नाट फायदे…

मुनव्वर फारूकीने गुपचूप उरकलं दुसरं लग्न? प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लावली हजेरी