मुनव्वर फारूकीने गुपचूप उरकलं दुसरं लग्न? प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लावली हजेरी

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी(celebrities) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मुनव्वर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी मुनव्वर याची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता मुनव्वर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान कॉमेडियनबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. स्टँडअप कॉमेडियनच्या लव्ह लाईफबाबत काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.

मुनव्वर फक्त कॉमेडियन नाहीतर, सोशल मीडिया(celebrities) सेंसेशन देखील आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील मुनव्वर याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता मुनव्वर याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहेत. मुनव्वर याने गुपचूप दुसरं लग्न केल्याची माहिती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

रिपोर्टनुसार, मुनव्वर याने दुसरं लग्न केलं आहे. मुनव्वर आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मुनव्वर याने जवळपास 12 दिवसांपूर्वी लग्न केल्याची माहिती मिळत आहे. मुनव्वर याच्या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबिय आणि मित्र-परिवार उपस्थिती होते… अशी देखील माहिती समोर येत आहे.

मुनव्वर याचं दुसरं लग्न झाल्याचा दावा त्याच्या जवळच्या सूत्राने केला आहे. मुनव्वर याचं लग्न मुंबईतील आयटीसी मराठा येथे झाले. मुनव्वरने कोणताही फोटो शेअर केलेला नाही कारण त्याला त्याचं लग्न गुप्त ठेवायचं आहे. मुनव्वर याच्या पत्नीचं नाव मेहजबीन कोतवाला असं आहे.

मेहजबीन कोतवाला मेकअप आर्टिस्ट असल्याची देखील माहिती मिळत आहे. मुनव्वर याच्या लग्नात अभिनेत्री हिना खान देखील उपस्थितीत होती. मुनव्वj आणि हिना चांगले मित्र आहेत. दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुनव्वर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ जिंकल्यानंतर मुनव्वर फार व्यस्त झाला आहे. अनेक शो करताना देखील मुनव्वर दिसत आहे. अभिनय विश्वात देखील मुनव्वर पदार्पण करणार आहे. ‘फस्ट कॉपी’ या वेब सीरिजमध्ये मुनव्वर भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

व्हॉट्सअपचा आलाय ‘मल्टि लॉगिन’ ऑप्शन…

आयपीएलचा अंतिम सामना फिक्स होता?, नाण्याच्या दोन्ही बाजूला हेड…Video

भारत जिंकले आता जिओची आफ्रिकन सफारी! अंबानींचा ‘या’ देशातील दूरसंचार उद्योगावर डोळा