अक्षय्य तृतीयेपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरवाढीत ब्रेक

मुंबई: अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर, जागतिक व्यापार तणाव आणि अनेक देशांमध्ये सोन्याच्या(gold price) साठ्यात वाढ अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. याशिवाय अक्षय्य तृतीया येणार असल्यामुळे आता सोन्याचे भाव आणखी वाढणार आहे. धनत्रयोदशी किंवा लग्नसराईसारख्या सणांमध्ये मोठी मागणी असल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव येताना दिसतोय.

अक्षय्य तृतीयेला लोक सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिल २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमध्ये, यावेळी सामान्य माणूस सोने सहज खरेदी करू शकेल का? हा प्रश्न कायम आहे.

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे भाव १,००,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाजही वर्तवला जात आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९८,३५० रुपये इतकी आहे. सोन्याचा भाव अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरलेला दिसत आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ९०,१५० इतकी आहे. अक्षय्य तृतीये सोनं(gold price) स्वस्त झाल्याने ग्राहकांना आता दिलासा मिळाला आहे.

चांदीची किंमत लाखभराच्या दरात असून रोजच्या रोज चांदी वाढताना दिसत आहे. आज चांदीची एक किलोप्रमाणे १,०१,००० रुपये इतका आहे. चांदीचा भाव सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला पाहायला मिळाला होता.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई९०,१५० रुपये९२,९०० रुपये
पुणे९०,१५० रुपये९२,९०० रुपये
नागपूर९०,१५० रुपये९२,९०० रुपये
कोल्हापूर९०,१५० रुपये९२,९०० रुपये
जळगाव९०,१५० रुपये९२,९०० रुपये
ठाणे९०,१५० रुपये९२,९०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये
पुणे९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये
नागपूर९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये
कोल्हापूर९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये
जळगाव९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये
ठाणे९८,३५० रुपये१,०१,३५० रुपये

हेही वाचा :

श्रेयस अय्यरने धडाकेबाज कामगिरीने करुन दाखवलं, BCCI ने आधी वगळलं

राज्य सरकारचा मेगा प्लॅन, कॅबिनेट बैठकीत घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *