लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका

उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अमेठीतून केंद्रीय मंत्री(political campaign) स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे. इराणी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा(political campaign) पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसने यावेळी आपली रणनीती बदलली. या निवडणुकीच्या सुरुवातीला राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, पण अखेरच्या क्षणी ते अमेठीतून आणि बहीण प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राहुल यांना रायबरेलीतून आणि अमेठीतून सोनिया गांधींचे काम पाहणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले.

हेही वाचा :

महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली…

टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली ‘इतकी’ वाढ

सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले