टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली ‘इतकी’ वाढ

टी20 वर्ल्ड कप(t20 world cup) 2024 ची सुरुवात झालीय. 2 जूनपासून 29 जूनपर्यंत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा खेळवली जातेय. टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या संघांवर यंदा पैशांचा पाऊस होणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने प्राईज मनीची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 11.25 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात तब्बल 93.51 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

आयसीसी टी20 वर्ल्ड कप(t20 world cup) 2024 चं जेतेपद टकावणाऱ्या संघाला 2.45 मिलियन डॉलर म्हणजे 20.36 कोटी रुपये मिळणार आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासत पहिल्यांदा चॅम्पियन ठरणाऱ्या संघाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्राईज मनी मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला 1.28 मिलियन डॉलर म्हणेज भारतीय रुपयात 10.64 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

सेमीफायनल पराभूत होणाऱ्या दोन संघांना धनलाभ होणार आहे. पराभूत संघांना 787,500 डॉलर म्हणजे 6.54 कोटी रुपये दिले जाणार आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 20 संघांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संघाला पैसे मिळणार आहेत. सुपर-8 राऊंडमध्ये पराभूत होणाऱ्या संघालाही 382,500 डॉलर प्राईज मनी मिळणार आहे.

नऊ ते बारा स्थानावरच्या संघांना प्रत्येकी 247,500 डॉलर म्हणजे 2.57 कोटी रुपये मिळणार आहे. तर 13 ते 20 व्या स्थानावर असणाऱ्या संघांना प्रत्येकी 225,000 डॉलर म्हणजे 1.87 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेत ग्रुपमध्ये जिंकणाऱ्या प्रत्येक विजयी संघास 25.89 लाख रुपयांचा लाभ होणार आहे.

टी-20 वर्ल्डकपची प्राइज मनी

  • विजेता : 20.36 कोटी रुपये
  • उप-विजेता: 10.64 कोटी रुपये
  • सेमीफाइनल : 6.54 कोटी रुपये
  • दुसऱ्या राऊंमधून बाहेर होणाऱ्या संघास : 3.17 कोटी रुपये
  • 9 ते 12 व्या स्थानावरील संघास : 2.05 कोटी रुपये
  • 13 ते 20 व्या स्थानावरील संघास : 1.87 कोटी रुपये
  • पहिल्या आणि दुसऱ्या राउंडमध्ये विजय : 25.89 लाख रुपये

हेही वाचा :

आता T20 वर्ल्ड कप बघा ‘फ्री’ ते ही मोबाईल आणि टीव्हीवर

मोठी ट्विस्ट… भाजपला जबरदस्त धक्का… जोरदार बढतीनंतर मोठी घसरण

सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले