भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे

भाजप उमदेवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद निर्माण झालाय.(filed) पोलिंग बूथवर माधवी लता यांच्याकडून मतदारांचे इलेक्शन कार्ड तपासण्यात आले. तसंच मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरचे बुर्खेही काढण्यास सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशभरातील 96 जागांवर मतदान परा पडतंय. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. AIMIM उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडतंय. या दरम्यान या मतदारसंघातील एक व्हिडिओ सकाळी व्हायरल झाला आणि एकच वाद निर्माण झाला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत भाजप उमेदवार माधवी लता बुर्खा परिधान केलेल्या महिलांची ओळख पटवत असल्याचं दिसतंय.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर वाद उभा राहिला असून (filed)भाजप उमेवार माधवी लता यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्हिडिओत माधवी लता मतदानासाठी आलेल्या मुस्लीम महिलांना त्यांचे चेहरे पाहण्यासाठी बुर्खे हटवण्यासाठी सांगितलं जातं होतं. एका मुस्लिम महिलेकडे माधवी लता यांनी निवडणूक ओळखपत्र मागितलं, त्या महिलेने आपलं कार्ड दाखवल्यानंतर महिलेला वय विचारण्यात आलं. त्या महिलेने आपलं वय 38 असल्याचं सांगितलं. यावर माधवी लता यांनी तू 38 वर्षांची वाटत नसल्याचं सांगत तिला चेहऱ्यावरचा बुर्खा हटवण्यास सांगितलं. यावरुन वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी निवडणूक आयोगाला टॅग करत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

माधवी लता यांचं उत्तर
वाद निर्माण झाल्यावर माधवी लता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण खूप प्रेमाने विनम्रेपणे महिलांना त्यांची ओळख पटवण्यास सांगितलं आणि तो आपला हक्क असल्याचं माधवी लता यांनी सांगितलं. हा केवळ निवडणुक मुद्दा बनवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पण यानंतरही माधवी लता यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मलकपेट पोलीस स्थानकात कलम 171सी, 186, 505 1 सी अंतर्गत एफआयर दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओत माधवी लता मुस्लिम महिला उमेदवारांना तुम्ही कोण आहात? तुमचं आधारकार्ड दाखवा असं विचारताना दिसतायत. यावेळी त्यांच्याबरोबर एक मतदान कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी असल्याचं व्हिडिओत दिसतंय.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. गेल्या चार (filed)दशकांपासून ही जागा ओवैसी कुटुंबाकडे आहे. अशात भाजप उमेदवारी माधवी लता यांनी ओवैसी यांचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी इथे येऊन प्रचार केला.

माधवी लता यांनी मतदारांचं निवडणूक ओळकपत्र तपासल्याने सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका यजुरने उमेदवारांना मतदाराची ओळख पटवण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न विचारला आहे. या युजरने निवडणूक आयोगालाही हा सवाल टॅग केला आहे. एका युजरने हा मतदाराचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा :

‘धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरे….’, राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य

नरेंद्र मोंदींनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना का दिली ऑफर? प्रकाश आंबेडकर

हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी बहुमत सिद्ध करणार?अधिवेशन बोलावण्याच्या तयारी