सांगलीतील उमेदवार विशाल पाटलांची बदनामी, दोघांविरोधात गुन्हा नोंद
इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, न्यूज पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व (registered)त्यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सांगली लोकसभा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला. जागा वाटपावरून झालेल्या महाविकास आघाडीतील मतभेदामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी राहिले. अशातच मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची बदनामी करणारे संदेश व्हाट्सअपवर व्हायरल झाले. त्यावर आक्षेप घेतलेल्या विशाल पाटील यांच्या समर्थकांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी संशयित तानाजी जाधव, शुभम शिंदे या दोघांविरूद्ध फिर्याद सांगली(registered) पोलिसात तक्रार दिली होती. या दोघा संशयतांनी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, न्यूज़ पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटांकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आणि काँग्रेसचे बंडखोरी अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सात मे रोजी मतदान पार पडले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सहा मे रोजी खासदार संजयकाका जनसंपर्क नामक व्हाॅट्सअप ग्रुपवर ‘मदनभाऊ गट विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त.
विशाल पाटील यांची सीट धोक्यात.’ असा मजकुर असणारा व्हिडीओ आणि काही लिंक्स (registered)व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल केल्या. शिवाय इतर आक्षेपाह व्हिडीओ प्रसारित केले. या संपूर्ण प्रकरणावर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. दोघा संशयाविरोधात तक्रार दिली. उमेदवाराची प्रतिमा मलिन करून मतदानावर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. विशाल पाटील यांचे प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा :
कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार
खळबळजनक! मतदानाच्या दिवशीच नेत्याची हत्या
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली ‘तारक मेहता…’ची सोनू