सोशल मीडियावर सध्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ हवेच्या वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. यात एका स्कूल बसचे(school bus) ब्रेक फेल झाल्याचे समजते, ज्यांनंतर अनियंत्रित झालेल्या या बसने रेड सिग्नलवर थांबलेल्या अनेक गाड्यांना चिरडले. यावेळी बस जे दिसेल त्याला चिरडत पुढे ढासळू लागली.

घटनेचे हे भीषण रूप सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत तर एकाच मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आता यात नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात चालू रस्त्यावरील काही दृश्ये दिसून येत आहेत. यावेळी सिग्नलवर काही गाड्या थांबलेल्या दिसून येतात. इथपर्यंत सर्व सामान्य असते मात्र पुढच्याच क्षणी इथली दृश्ये भीषण अपघातात बदलतात आणि तिथे एकाच गोंधळ माजतो.
वास्तविक, एका स्कूल बसचे(school bus) ब्रेक फेल झालेले असतात ज्यांनंतर मागून येणारी ही बस पुढे सिग्नलवर उभ्या असलेल्या तब्बल ८ वाहनांना चिरडत पुढे जाते. हे सर्व दृश्य तेथे उपस्थित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते आणि आता हेच फुटज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भोपाळमधील बाणगंगा चौकात हा अपघात घडून आला. यात एका स्कूल बसची ८ वाहनांशी टक्कर झाली. या अपघातात एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Accident in Bhopal, Break fail hogaye school bus ke (May 13 2025) pic.twitter.com/FFJEFVF2wT
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) May 14, 2025
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सिग्नलवर १०-१२ वाहने उभी होती. तेवढ्यात मागून एक स्कूल बस आली. बस ड्रायव्हर हलवा, हलवा असे ओरडत होता. काही सेकंदातच बस लोकांना चिरडत पुढे सरकली. बस रोशनपुरा चौकातून पॉलिटेक्निककडे जात होती.
भीषण अपघाताचा हा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीही सर्व माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बसच्या मागे राहिलात तर समस्या आहे, जर तुम्ही समोर राहिलात तर समस्या, करायचं तरी काय”.
हेही वाचा :
‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय
कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आठवड्यातील दोन वेळा करा ‘या’ पानांचे सेवन,