कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आठवड्यातील दोन वेळा करा ‘या’ पानांचे सेवन,

राज्यासह संपूर्ण देशभरात अवकाळी पाऊसाचे थैमान सुरु आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे(immunity). अवकाळी पाऊसामुळे बऱ्याचदा साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. सर्दी, खोकला, कावीळ, ताप, डोकेदुखी इत्यादी आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती(immunity) कमी होणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. यामुळे शरीराची ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांसह सगळ्याच फळे खाण्याचा सल्ला देतात. निरोगी आरोग्यासाठी नियमित ताज्या फळांचे सेवन केले जाते. फळांसोबतच फळांची पाने आणि बिया सुद्धा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. फळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती(immunity) सुधारण्यासाठी आठवडाभरातुन दोनदा कोणत्या पानांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.

पेरूच्या पानांचे फायदे:
रक्तात वाढलेली साखर संपूर्ण शरीराचे नुकसान करते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. मात्र योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील इतर अवयवांनासुद्धा इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित पेरूच्या पानांचे सेवन करावे. पेरूच्या मोठ्या प्रमाणावर फायबर आणि इतरही घटक आढळून येतात.

वजन कमी होते:
वाढलेले वजन शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे . सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पेरूची पाने नियमित चावून खाल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. तसेच वारंवार लागणारी भूक नियंत्रणात राहील आणि लवकर भूक लागणार नाही.

पचनक्रिया सुधारते:
रोजच्या जेवणात सतत तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, ऍसिडिटी, पित्त इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. तसेच शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित किंवा आठवड्यातून दोनदा पेरूची पाने चावून खावी. पेरूची पाने खाल्यामुळे आम्ल्पित्ताचा त्रास कमी होतो. पोटात वाढलेला गॅस आणि उष्णता कमी करण्यासाठी पेरूची पाने चावून खावीत.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:
पेरूच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ब्राँकायटिस, दातदुखी, ऍलर्जी, जखमा, घसा खवखवणे आणि कमजोर दृष्टी इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पेरूची पाने चावून खावीत. पेरूची पाने चावल्यामुळे तोंडातील हानिकारक विषाणूंपासून सुटका मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय

‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल