ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव… 

राज्यभरात सध्या लोकसभेचा रणसंग्राम(minister) सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार जालन्यामधून समोर आला असून जालन्यात केंद्रिय मंत्री आणि भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना मराठा बांधवांनी घेराव घातल्याचा प्रकार घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यातील गोलापांगरी येथे आज रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान(minister) मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली ही विनंती मान्य करत दानवे व्यासपीठावरून खाली उतरले यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा बाजी केली.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी शांतपणे आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे निवेदन स्विकारले तसेच त्यांची मनधरणी करण्यात यशही मिळवले. या सभेनंतर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर वातावरण निवळल्याचे पाहायला मिळाले. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मागच्या अनेक दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या प्रचारापासून दूर होते. त्यामुळं आज दुसऱ्यांदा दानवेंनी खोतकरांची भेट घेतली असून दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता दोघांच्या मनोमिलनानंतर आजपासून खोतकर दानवेंचा प्रचार सुरु करणार आहेत.

हेही वाचा :

साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

गुगल पे, फोन पेला BHIM लोळवणार मातीत; सरकारने सुविधांचा खुराक वाढवला

हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार