प्रत्येक ऋतूत त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.(skin ) तर काही लोकं महागडे स्किन केअर प्रोडक्ट विकत घेऊन त्वचेवर लावत असतात. तर काहीजण हे घरगुती उपायांचा वापर करतात. यामध्ये कोरफड जेलचाही समावेश आहे. बरेच लोकं कोरफडीचे जेल अनेक प्रकारे वापरतात. तर या जेलमध्ये व्हिटॅमिन ई, गुलाबपाणी किंवा नारळाचे तेल टाकूल फेस पॅक बनवून याचा वापर त्वचेवर करत असतात. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि चमकदार बनण्यास मदत होते.
कोरफड जेल चेहऱ्यावरील डाग आणि पेगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. (skin )आता आपण प्रत्येकाने या जेलच्या फायद्यांविषयी खूप ऐकले असेल, परंतु कोरफड जेल ही त्वचेला नुकसान देखील पोहोचवू शकते. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण कोरफड जेल त्वचेला कसे फायदेशीर आणि हानिकारक ठरू शकते हे तज्ञांकडून जाणून घेऊया.
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते, परंतु त्याचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर करणे महत्त्वाचे आहे. कोरफड जेलमध्ये जीवनसत्त्वे अ, क, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात. (skin )यासोबतच त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि सूर्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यास कोरफड जेल मदत करते. एवढेच नाही तर त्वचेवर येणारे मुरुम, पुरळ, जळजळ आणि ॲलर्जीसारख्या समस्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. कोरफड त्वचेची जळजळ कमी करते आणि जखमा बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करते, म्हणून ते त्वचेच्या काळजीसाठी वापरले जाते.
हेही वाचा :