पुढील ४ दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता

मुंबईसह कोकणामध्ये सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे(rain). पुढील चार दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे विदर्भामध्ये वादळी पावसाने हजेरी लावल्याचं दिसत आहे.

आज विदर्भाला गारपिटीसह वादळी पावसाचा(rain) इशारा देण्यात आला आहे आहे. अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. उर्वरित राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत ईशान्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक असं हवामान तयार होत आहे.

वाशीम, नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. अकोला, मालेगाव, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान होतं.

कोकणामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट जाणवत आहे. ही लाट आणखी पुढील चार दिवस राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ…

एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई; रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी