तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत(claim). राज्यात निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहे. तर दोन टप्प्यात मतं खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठी रस्सीखेच सुरु आहे. राज्याच्या राजकारणात अनेक नवीन मुद्यांची भर पडली आहे. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मु्द्या सध्या ऐरणीवर आहे. तर भाजपने नवनवीन मुद्यांवर काँग्रेसाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच महाविकास आघाडीतील या बड्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे.
अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर(claim) तोफ डागली. देशात मोदी हे प्रचाराच्या नावाखाली धुडगूस घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. मोदींची तब्येत ठीक नाही, त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. मोदींनी एकाही सभेत काम केल्याचा आढावा दिला नाही. काळा पैसा नष्ट करणाची वल्गना करणारे मोदी काळा पैसा काँग्रेसला दिला अस सांगतात. या बद्दल माहिती आहे त्यांना आणि त्याची चौकशी करत नाही. मोदींनी ज्यांच्यावर याप्रकरणी आरोप केलेत, त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ४ जूनपर्यंत शिंदे यांना काय तांडव करायचा आहे ते करू देत. शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केला आहे.
देशातील अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कधीच विसर्जीत होणार नाही, किंवा विलनीकरण होणार नाही. आम्ही आमचा पक्ष आनेक संकटात टिकवून ठेवला, बाळासाहेब ठाकरे असतानाही अनेक नेते सोडून गेले. जुने जातात नवे येतात. आमच्याकडे आत्मविश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे, आमच्याकडे पक्ष नेतृत्व आहे, असे राऊत म्हणाले.
अजित पवारांना खोटे बोलण्याची सवयच लागली आहे, असा घणाघात राऊतांनी घातली. ते भाजप सोबत गेले आहेत. भाजप मध्ये खोटे कोण बोलू शकते हे एकमेव क्वालीफिकेशन लागते. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील निवडूण येणार आहेत. सांगलीमध्ये कोण काय केले आहे याचा रिपोर्ट ठाकरेंकडे आला आहे. शिवसेना कोणताही काम अर्धवट सोडत नाही.
हेही वाचा :
सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय, निर्यातीला सरकारचा खोडा
हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर Video Viral
‘१५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल समजणार नाही…’ नवनीत राणांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा