महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून हायअलर्ट

पूर्वमोसमी पावसाच्या रासरी कोसळत आहेत(it rain). कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. शनिवारी (ता. ११) पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाचे(it rain) ढग दाटून येत असून, शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, संभाजीनगर, नांदेड, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यांत हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस आणि मालेगाव, सोलापूर, धुळे येथे ४२ अंशपिक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुण्यात आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर राज्याच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील तीन दिवस(11, 12 आणि 13 मे रोजी) हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूरमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.

तर गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेंत भर पडली आहे. तसेच राज्याच्या काही भागामध्ये अवकाळीसह गारपीटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा :

धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात… धरले ‘थला’चे पाय अन्…

Hanooman AI भारतात लाँच; 98 भाषांमध्ये काम करणार अ‍ॅप

सलमान खानच्या बहिणीचा मोडणार संसार?, आयुष शर्माने सांगितलं मोठं सत्य