कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क
गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोचे दर(price) प्रचंड प्रमाणात वाढले होते. मात्र यंदाच्या वर्षी कोथिंबीरने प्रचंड भाव खाल्ला आहे. अशातच आता कोथिंबीरने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करायला सुरुवात केली आहे. कारण कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस जास्तच वाढताना दिसत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे.
कोथिंबीर रोजच्या जेवणातील एक महत्वाचा भाग आहे. मात्र आता कोथिंबीर गृहिणींना परवडेनाशी झाली आहे. सध्या कोथिंबीरचे उत्पादन कमी होत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशातच आता नाशिक बाजार समितीत काल म्हणजेच 8 सप्टेंबरला लिलाव पार पडला. यावेळी पार पडलेल्या लिलावात गावरान कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळाला आहे. कोथिंबिरीच्या जुडीला इतका भाव(price) मिळाल्याने सर्वचजण चकित झाले आहेत.
नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सध्याच्या परिस्थीला नाशिक, दिंडोरी, पिंपळगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वर यासह आदी भागांतून पालेभाज्या आणि फळभाज्या विकीसाठी येत असतात. तसेच या बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात आणि अहमदाबादकडे पाठविला जातो. तर काही प्रमाणात हा शेतमाल स्थानिक विक्री साठी व्यापारी खरेदी करत असतात. मात्र सध्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. यामुळे बाजारभाव देखील चांगलेच वधारले आहेत .
बाजार समितीत काल झालेल्या लिलावात गावरान कोथिंबीर किमान 65 रुपये जुडी ते सर्वाधिक 400 रुपये जूडी, तसेच चायंना कोथिंबीर किमान 40 तर सर्वाधिक 280 रुपये जूडी यासह मेथी किमान 50 तर सर्वाधिक 130 रुपये जूडी, कांदापात किमान 15 तर सर्वाधिक 42 रुपये जूडी, शेपू किमान 22 तर सर्वाधिक 57 रुपये जूडीला भाव मिळाला आहे.
बाजारभावाच्या लिलावाप्रमाणे किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची जुडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत असल्याचे दिसत आहे. तसेच भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने गृहिणींचे घरातील किचनचे बजेट देखील कोलमडले आहे.
हेही वाचा:
अवघ्या काही दिवसांत ‘या’ 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 11 दिवस आधी ऑगस्ट महिन्यातच विराजमान होणार बाप्पा
बायकोच्या अनैतिक संबंधांमुळं नवऱ्यानं आत्महत्या केल्यास ती दोषी नाही
बायकोच्या अनैतिक संबंधांमुळं नवऱ्यानं आत्महत्या केल्यास ती दोषी नाही