जयंत पाटलांकडून टीकास्त्र; देवेद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, जयंत पाटील राष्ट्रवादीत… नागपुरात(latest political news)माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसंच कल्याणच्या जागेवरही भाष्य केलंय.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. काल देवेंद्र फडणवीस बोलले ते त्यांचं बोलणं हास्यास्पद आहे. बारामती मतदारसंघात निवडणूक कुणा विरोधात कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीने उत्तर देतील. त्यांचा नेरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न दिसत आहे. कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कम्पॅरिझन त्यांच्यासमोर आलं असेल, असं आज सकाळी पुण्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा (latest political news)गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर तुमचं मत काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी उत्तर दिलं. जयंत पाटील हे संबंधहिन बोलतात. ते स्वत:चं राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराज आहेत. ते इतके नाराज आहे की, त्यांच्या पक्षात त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या देशात एवढी मोठी निवडणूक होतेय. पण राष्ट्रवादीत कोण दिसतं, तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार… या सगळ्यात जयंत पाटील कुठे आहेत?, असंही फडणवीस म्हणाले.

भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. (latest political news)श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महायुतीचे उमेदवार असणार आहे. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना स्थापना दिनानिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा… आज आम स्थापना दिनी आम्ही संकल्प केलाय… की शेवटच्या माणसापर्यंत पोहचून, वंचितांचा विकास करायचा. विकासीत भारताची यात्रा सुरु आहे. बुथ चलो अभियान आम्ही वारंवार राबवतो. आज स्थापना दिनाचं औचित्य साधून आज पुन्हा बुथवर चाललोय. आम्ही नेहमीच बुथ सक्षमीकरणावर भर देतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेचा तिढा दिल्ली दरबारी

“सुंदर मुली घ्या पाणीपुरी” नाविन्यपूर्ण उदयनराजेंची दाद, वायसी कॉलेज मध्ये नेमकं काय घडलं?

जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत… कोयता नाचवत रील बनवली, पोलिसांनी दट्ट्या देताच हिरोगिरी…