बद्धकोष्ठता वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य पूर्णपणे बिघडून (health)जाते.अशावेळी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ओव्याची पाने कोमट पाण्यासोबत चावून खाल्ल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारेल आणि शरीराला अनेक फायदे होतील.

दिवसाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण दिवस खूप जास्त कंटाळवाणा आणि खराब (health)जातो. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचशा धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, तिखट आणि तेलकट पदार्थ, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रोजच्या रोज शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास पोट फुगणे, पोटात गॅस तयार होते, ऍसिडिटी, अपचन, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
सकाळी उठल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास शरीराला हानी पोहचते आणि संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. याशिवाय अन्ननलिकेमध्ये पित्त जमा होते. अन्ननलिकेमध्ये जमा झालेल्या पित्तामुळे छातीमध्ये जळजळ वाढणे, छातीमध्ये दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी आणि पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पानांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पानांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहील.
ओव्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:
आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ओव्याची पाने शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. या पानांमध्ये थाइमॉल नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ओव्याचे सेवन केल्यामुळे केवळ अन्नपदार्थांच नाहीतर संपूर्ण शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता दूर होते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ओव्याचे पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ओव्याचे पानांचे पाणी प्यायल्यास आतड्या स्वच्छ होतात. आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जातील. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासोबत ओव्याची पाने चावून खावीत. ओव्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला अनेक गुणकारी फायदे होतील.
ओव्याची पाने चावून खाल्ल्यास पोट हलके होते. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या ऍसिडिटी आणि अपचनामुळे पोटात गॅस जमा होतो. पोटात जमा झालेला गॅस बाहेर पडून गेला नाहीतर आतड्यांमध्ये किंवा पोटात तसाच साचून राहतो, ज्यामुळे पोटात दुखणे, पोटात मुरड मारून येणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याची पाने प्रभावी ठरतील. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. याशिवाय ओवा खाल्ल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात.
या पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन:
ओव्याचे पाणी तयार करताना टोपात पाणी गरम करून त्यात स्वच्छ धुवून घेतलेली ओव्याची पाने टाकून १० मिनिटं उकळवून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. नियमित ओव्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
हेही वाचा :
‘भूत कोला’ पण सण देवाचा…
वेळीच सावध होऊन घ्या उपचार
आजचा बुधवार राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने अडचणी होतील दूर,