अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ 5 गोष्टी; सुख-समृद्धीत होईल भरभराट
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया(prosperity) साजरी केली जाते. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ योग तयार होतात. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं. या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी म्हणजेच (उद्या) साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी काही विशेष काम केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
अक्षय्य तृतीयेला ‘या’ गोष्टी करा
देवीची विधीवत पूजा करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक(prosperity) पूजा करावी. लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करावा. पूजेत देवीला गुलाबाचे फूल अर्पण करून खीर अर्पण करावी. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धन-समृद्धी प्राप्त होते.
पाण्याने भरलेला कलश दान करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते. कलशमध्ये थोडे पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होते. या दिवशी साखर, पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
घराच्या दारावर अशोकाची पाने बांधा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा किंवा अशोकाची पाने बांधावीत. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख-समृद्धी येते. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते.
सोने खरेदी करा
सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही. या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते.
वृक्षारोपण करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पिंपळ, आंबा, वड, आवळा, बाईल, जांभूळ, कडुलिंब आणि इतर फळझाडे लावणे उत्तम मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य प्राप्त होते.
हेही वाचा :
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
पुढील ४ दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता
एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई; रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी