तुमच्याही घरात रोज भांडणं होतात? मग हे झाडं घरात ठेवूच नका, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. तुमच्या घराची रचना कशी असावी?(house) या बाबतचे नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या वास्तुची रचना ही योग्य नसेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगते. यामध्ये आर्थिक, आरोग्यविषयक अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्याचे परिणाम दीर्घकाळ राहातात असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक घर खरेदी करताना नेहमी वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ज्ञांचं मत विचारात घेऊनच घराची खरेदी करतात किंवा बांधकाम करतात.

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची दिशा कोणती असावी? तुमच्या घराचं मुख्य प्रवेश द्वार कोणत्या दिशेला असावं? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असू नये? अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवता,(house) त्या वस्तुंची दिशा देखील योग्य असायला हवी असं वास्तुशास्त्र सांगतं. घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या वस्तू असू नयेत? वस्तूंची दिशा कोणती असावी? अशा एकना अनेक विषयांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

 

एवढंच नाही तर तुमच्या घरात काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असू नये, त्याचे परिणाम अशुभ असतात असं देखील वास्तुशास्त्र सांगतं, (house)त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये काटेरी वनस्पती असता कामा नये, जसं निवडूंग वगैरे, कारण या वनस्पतींचा गुणधर्मच असा असतो, की त्यामुळे घरातील शांतता भंग पावते, घरात नेहमी वादविवाद कलह होतात, भांडण होतात. त्यामुळे या वनस्पती घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, याला फक्त एकच झाडं अपवाद आहे ते म्हणजे गुलाबाचं, गुलाबाच्या झाडाला जरी काटे असले तरी देखील अशुभ मानलं जातं नाही. मात्र जर तुमच्या घरात काटे असलेली इतर कोणतीही वनस्पती असेल तर ती घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे.

हेही वाचा :