इलॉन मस्कच्या निर्णयामुळे भारतात एक्सवर बंदी?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने आपली पॉलिसी अपडेट केली आहे. इलॉन मस्क(elon musk) यांच्या या प्लॅटफॉर्मवर अडल्ट कंटेंट पोस्टिंग करता येणार आहे. त्याला तशी परवानगी देण्यात आलीय.

इलॉन मस्क(elon musk) हे स्वतःच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर न्यूडिटी प्रमोट करण्यासंबंधीचे आरोप करत असतात. वास्तविक, आता त्यांच्याच एक्स या प्लॅटफॉर्मवर अडल्ट कंटेंट पोस्टिंग करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

असा पॉर्न कंटेंट कुणाला दिसेल आणि कुणाला नाही, याबाबत कंपनीने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मात्र असा कंटेंट प्रसारित करण्यासाठी भारतात परवानगी मिळेल का? असा प्रश्न आहे. कारण भारतात पॉर्न वेब साईट्स बंद आहेत.

मागच्या आठवड्यात शनिवारी एक्सवर न्यूडिटीच्या संदर्भाने हॅशटॅग ट्रेंड होत होता. जेव्हा त्या हॅशटॅगवर क्लिक केलं तेव्हा त्यात काहीच पोस्ट नव्हत्या. एक अकाऊंट समोर येत होतं, त्यामुळे अनेक तास ते अकाऊंट टॉप ट्रेंडिंगमध्ये राहिलं. सध्या ते अकाऊंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असून त्यावर अडल्ट कंटेंट उपलब्ध आहे.

‘एक्स’ने आपल्या अडल्ट कंटेंट पॉलिसीच्या संबंधाने लिहिलं की, युजर्स आता सेक्शुअल थीमवर कंटेंट क्रिएट करुन डिस्ट्रिब्यूट आणि कन्झ्यून करु शकतात. परंतु असा कंटेंट सर्वसंमतीने आणि वैध पद्धतीने बनवला गेला पाहिजे.

हेही वाचा :

तुरुंगात बंद असलेला आरोपी खासदार म्हणून आला निवडून

विश्वजीत कदम: काँग्रेसला 99 वरून थेट ‘सेंच्युरी’वर नेलं..

इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे.