आता T20 वर्ल्ड कप बघा ‘फ्री’ ते ही मोबाईल आणि टीव्हीवर

क्रिकेट प्रेमींचा सीजन आता सुरु झाला आहे.(World Cup) कारण १ जून पासून ICC Men’s T20 World Cup 2024 मॅचेस सुरु झाल्या आहेत.चाहत्यांमध्ये त्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते. पण ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आणि या मॅचेसचे कुठेही,कोणत्याही ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण बघण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. जर तुम्हालाही फ्रीमध्ये लाईव्ह मॅच बघण्याची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

वार्षिक T20 विश्वचषक स्पर्धा दोन(World Cup) देशांमध्ये होणार आहे: वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स. 20 संघांचे चार गट करण्यात आले असून प्रत्येकात पाच संघ आहेत. गटातील शीर्ष दोन संघ ‘सुपर 8’ फेरीसाठी पात्र ठरतील. येथे आठ संघांना पुन्हा चार-चारच्या दोन गटात विभाजित केले जाईल. यातील शीर्ष दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील आणि अंतिम सामना 29 जून रोजी होईल.

हे सामने फ्री मध्ये कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney+ Hotstar यांना ICC Men’s T20 World Cup 2024 च्या सामन्यांचे प्रसारण आणि स्ट्रीमिंग करण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच तुम्ही सर्व 55 सामने Disney+ Hotstar वर पाहू शकता.

आनंदाची गोष्ट म्हणजे, OTT प्लॅटफॉर्मने त्यांच्या मोबाइल अॅपवर सर्व T20 विश्वचष सामने विनामूल्ये पाहण्याची सुविधा दिली आहे. मात्र, जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर सामने पाहायचे असतील तर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनच्या पर्यायांबद्दल जाणून घ्या. तसेच, भारतात विश्वचषक 2024 ची लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी Jio, Airtel आणि Vodafone Idea यांचे स्पेशल रिचार्ज प्लॅन्स देखील आहेत.त्यामध्ये अगदी कमी दरांमध्ये तुम्ही Free Subscription घेऊ शकता आणि मॅचचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा