Flipkart GOAT सेलला 12 जुलैपासून सुरुवात, ‘या’ वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही सेलची घोषणा केली आहे.(discounts)फ्लिपकार्ट GOAT सेल 2025 12 जुलैपासून सुरु होणार आहे. 17 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना बंपर डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे महागड्या वस्तू कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.फ्लिपकार्ट GOAT सेल फ्लिपकार्ट प्लस युजर्ससाठी 24 तास आधी लाईव्ह होणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी अ‍ॅक्सिस, एचडीएफसी आणि आयडीएफसी बँकेशी करार केला आहे. त्यामुळे शॉपिंग करताना तुम्ही या बँकेचे कार्ड वापरले तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आवडीचे प्रोडक्टस आणखी स्वस्त मिळणार आहेत.

फ्लिपकार्टने आपल्या एक्स अकाउंटवरून या सेलबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.(discounts) यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस24 डिस्काउंटनंतर 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे. तसेच एचपी लॅपटॉप, फ्रंट लोड वॉशिंग मशीन देखील कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.फ्लिपकार्टवरील हजारो उत्पादनांवर सूट मिळणार आहे. तसेच काही बँकांच्या कार्ड सवलत मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय सुविधा देखील मिळणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपच नव्हे तर टीव्ही, एसी फ्रीज या वस्तूही कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. मात्र या वस्तूंवर किती टक्के सवलत मिळणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अमेझॉनने सेलसाठी आयसीआयसीआय आणि एसबीआय बँकेशी हातमिळवणी केली आहे, याचा अर्थ असा की जर तुम्ही सेल दरम्यान खरेदी करण्यासाठी या बँकांच्या कार्डांचा वापर केला तर तुम्हाला १० टक्के बचत करण्याची उत्तम संधी मिळेल अमेझॉन प्राइम डे 2025 हा सेल 12 जुलै ते 14 जुलै 2025 पर्यंत चालेल. (discounts)हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी असेल. जर तुम्ही अमेझॉन प्राइमचे सदस्य असाल तरच तुम्ही या डीलचा लाभ घेऊ शकाल. या काळात तुम्ही आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता.

हेही वाचा :