बीएसएनएलचं फक्त 90 मिनिटांत घरपोच सिमकार्ड! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आता खाजगी कंपन्यांना टक्कर (minutes)देण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच BSNL आपली 4G आणि 5G सेवा सुरू करणार असून, या पार्श्वभूमीवर कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता BSNL सिमकार्ड फक्त दीड तासात घरपोच मिळणार आहे. ग्राहकांना यासाठी कोणत्याही दुकानात किंवा सेंटरवर जाण्याची गरज नाही.

BSNL सिम मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया :
BSNL ने ग्राहकांसाठी सिमकार्डची(minutes)ऑनलाइन बुकिंग आणि होम डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
– ग्राहकांनी अधिकृत पार्टनर वेबसाइट https://prune.co.in वर जावे.
– तेथे आपले नाव, पत्ता आणि आवश्यक माहिती भरून सिम बुक करावे.
– एकदा ऑर्डर झाल्यानंतर, 90 मिनिटांच्या आत बीएसएनएलचं 4G/5G सिम तुमच्या दारात पोहोचवले जाईल

BSNL 5G SIM | 5G स्पेक्ट्रममुळे बीएसएनएलची मोठी तयारी :
BSNL ला सध्या 700 MHz आणि 3300 MHz या महत्त्वाच्या 5G फ्रिक्वेन्सी बँड्समध्ये स्पेक्ट्रम मिळाले आहे. यामुळे, रिलायन्स जिओ आणि एअरटेलसारख्या दिग्गज खासगी कंपन्यांना आता सरकारी स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, मागील 6-7 महिन्यांत बीएसएनएलने 55 लाख नवीन ग्राहक जोडले असून, आता कंपनीचा ग्राहक आकडा 9.1 कोटींवर पोहोचला आहे.BSNL ने यावर्षी जून महिन्यापासून 4G नेटवर्कला 5G मध्ये अपग्रेड करण्याची योजना आखली आहे. (minutes)कंपनीने 1 लाख 4G साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यापैकी 89,000 साइट्स आधीच कार्यरत झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून एप्रिल महिना ‘ग्राहक सेवा महिना’ म्हणून साजरा करण्यात आला होता.

हेही वाचा :

पंतप्रधान नट-नट्यांसोबत व्यस्थ अन्…; खासदार संजय राऊतांचा घणाघात

4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय

…अन् मॅचनंतर त्याने थेट पॉन्टिंगच्या बायकोलाच मारली मिठी! भारतीय क्रिकेटरचा Video चर्चेत