विवाहित महिलेवर २० वर्षांपासून अत्याचार; सासरा अन् दिरासोबत ठेवायला लावले शारीरिक संबंध

राजस्थान: येथील चुरू जिल्ह्यामध्ये एका विवाहित(married) महिलेवर २० वर्षांपासून तिच्या नवऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडलीय. नराधम पती वडील आणि भावासह अनेकांकडून पत्नीवर बलात्कार करत होता. याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केलीय. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचा नवरा चहामध्ये अमली पदार्थ टाकत होता आणि ही चहा तो पत्नीला प्यायला देत. चहा प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध होत असायची त्यानंतर तिला वासनेचं शिकार बनवलं जात असायचं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

चुरूमधील सांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात हा संतापजनक प्रकार समोर आलाय. दरम्यान पोलिसात तक्रार करणाऱ्या विवाहित(married) महिलेने ८ जणांवर बलात्काराचा आरोप केलाय. यात तिचे सासरे आणि दिराचाही समावेश आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा नवरा तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला जायचा. जर महिलेने विरोध केला तर तिला तिचा पतीकडून मारहाण केली जात होती. पीडिता महिलेला ३ मुले आहेत.

गेल्या १५-२० वर्षांपासून आपल्यासोबत अत्याचार होत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलंय. या पीडितेच्या पतीने तिच्यावर अनेकांकडून बलात्कार केला. पीडितेचा नवरा तिला अमली पदार्थाचे सेवन करायला लावून तिला बेशुद्ध करायचा. दरम्यान पीडितेने तक्रारीत ८ पुरुषांची नावे दिली आहेत.

अत्याचाराला विरोध केल्यानंतर पीडितेचा नवरा तिला मारहाण करायचा. एकदा तिने विरोध केल्यावर तिच्या नवऱ्याने पतीने तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची ३ मुले तिच्या भावासोबत राहतात. महिलेने सांगितले की, तिचा नवरा तिच्या भावालाही जिवे मारण्याची धमकी देत ​​होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

प्रेग्नेंट दीपिका पादुकोण दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना

टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! स्वत:च केला खुलासा

कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल