‘या’ दोन देशांमुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण; सोने 85 हजारांपर्यंत घसरणार का?

सोन्याच्या किमतींनी(Gold prices) अलीकडेच 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांकावर पोहोचत ऐतिहासिक शिखर गाठले होते. मात्र आता, या किंमतीत लक्षणीय घट झाली असून 92,000 रुपयांच्या खाली सोन्याचा भाव घसरला आहे.

घसरणीचे मुख्य कारण काय?

विशेषज्ञांच्या मते, ही घसरण अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी झाल्यामुळे झाली आहे. दोन्ही देशांनी परस्पर वस्तूंवर लादलेले आयात शुल्क 90 दिवसांसाठी शिथिल केले असून यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्यापासून दूर गेला आहे.

डॉलर निर्देशांक आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव

सलग चौथ्या आठवड्यात डॉलर निर्देशांक मजबूत होत आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात(Gold prices) घट झाली आहे.
स्पॉट गोल्ड अमेरिकेत प्रति औंस $3,210.19 वर पोहोचले आहे, जी नोव्हेंबर 2024 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण (3%) आहे.

भारतातील आजचे दर (गुड रिटर्न्सनुसार):

  • 22 कॅरेट: ₹87,360 प्रति 10 ग्रॅम
  • 24 कॅरेट: ₹95,290 प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट: ₹71,480 प्रति 10 ग्रॅम

आणखी किती घसरण होऊ शकते?

‘द मिंट’च्या अहवालानुसार, 94,000 रुपयांच्या खाली किंमत राहिल्यास घसरण कायम राहू शकते.
जर सोन्याने 89,500 ची पातळी गाठली, तर पुढचा सपोर्ट स्तर 85,000 रुपये असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला:

  • दीर्घकालीन गुंतवणूकदार: ही एक चांगली संधी असू शकते.
  • अल्पकालीन गुंतवणूकदार: सावध राहणे आवश्यक, कारण बाजार अजूनही अस्थिर आहे.

हेही वाचा :

पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण

राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

तरुणाला लाठ्याकाठ्या अन् बेल्टने बेदम मारहाण; व्हिडिओही व्हायरल