जून महिन्याची सुरुवात होताच आर्थिक आणि तांत्रिक नियमांमध्ये(rules ) मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होणार आहे. बँकिंग, गॅस दर, पीएफ सुविधा, क्रेडिट कार्ड सेवा, यूपीआय व्यवहार यांसारख्या क्षेत्रांमध्ये बदल होणार असल्याने नागरिकांनी याची माहिती घेतली पाहिजे.
कोणते बदल होणार? :
EPFO 3.0 नवे व्हर्जन :
१ जूनपासून ईपीएफओचं नवं EPFO 3.0 व्हर्जन लागू होणार आहे(rules ). यामुळे PF काढणे, केवायसी अपडेट करणे व क्लेम प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद होणार आहे. EPF संबंधित कार्ड देखील एटीएमसारखं वापरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
FD व कर्ज व्याज दरात बदल :
बँकांकडून FD व कर्ज दरात बदल होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात झाल्यास FD वरचं व्याज कमी होऊ शकतं. गुंतवणूकदार व निवृत्त व्यक्तींनी याकडे विशेष लक्ष द्यावं.
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स व चार्जेस :
कोटक महिंद्रा बँकसह काही बँका क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करणार आहेत. ऑटो-डेबिट फेल्युअरसाठी दंड कमी होणार असून फ्युअल व युटिलिटी बिल भरण्यावर अतिरिक्त चार्ज आकारला जाऊ शकतो.
एलपीजी सिलेंडर दर बदल :
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर बदलतात. १ जूनला घरगुती व व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ किंवा कपात होऊ शकते. गृहिणींच्या बजेटवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
ATM ट्रान्झॅक्शन चार्ज वाढ :
फ्री ट्रान्झॅक्शनची लिमिट ओलांडल्यानंतर ATM ट्रान्झॅक्शनवर लागणारे चार्जेस वाढण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांकडून वारंवार पैसे काढले जातात, त्यांना याचा फटका बसेल.
जून महिना ठरणार महत्वाचा :
म्युच्युअल फंड कट-ऑफ टाइम :
SEBI ने ओव्हरनाईट म्युच्युअल फंडसाठी नवा कट-ऑफ टाइम लागू केला आहे. ऑफलाइन व्यवहारांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत व ऑनलाइनसाठी संध्याकाळी ७ वाजेपर्यंतचा वेळ लागू होणार आहे.
आधार अपडेटसाठी शेवटची तारीख :
१४ जून २०२५ ही आधार अपडेट करण्याची शेवटची फ्री तारीख आहे(rules ). त्यानंतर ऑफलाईन अपडेटसाठी ₹२२ तर आधार केंद्रावर ₹५० शुल्क आकारले जाईल.
UPI व्यवहारात रिसिव्हरचं नाव दिसणार :
NPCI च्या नव्या नियमानुसार UPI व्यवहार करताना आता रेसिव्हरचं बँकेत असलेलं नाव दिसेल. QR कोडवर फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा नियम ३० जूनपर्यंत सर्व अॅप्ससाठी लागू करावा लागेल.
बँकांना १२ दिवस सुट्टी :
जून महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद राहतील. यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच बकरी ईदसारख्या सणांची सुट्टी यांचा समावेश आहे. त्यामुळे व्यवहार आधीच आटोपावेत.
युटिलिटी बिलावर शुल्क लागू :
क्रेडिट कार्डद्वारे वीज, पाणी यांसारखी युटिलिटी बिले भरताना काही बँका अतिरिक्त शुल्क लागू करू शकतात. तसेच, कॅशबॅकच्या अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!
UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल
हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार