मे महिन्यातील उष्णतेनंतर राज्यात अचानक आलेल्या पावसामुळे हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. १७ मे रोजीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची(rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करत राज्यातील २५ जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचे वातावरण कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची(rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
यलो अलर्ट असलेले जिल्हे कोणते? :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, धाराशिव, अकोला, बीड, नांदेड, लातूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, भंडारा, वाशिम आणि नागपूर या २५ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. विशेषत: दुपारनंतर वातावरण अधिक अस्थिर होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य शहरांमधील हवामानाचा अंदाज :
मुंबई – कमाल तापमान ३४°से. तर किमान तापमान २६°से. राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील आणि दुपारनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
पुणे – किमान तापमान २३°से. आणि कमाल तापमान ३५°से. राहील. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारी पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर – किमान २४°से. तर कमाल तापमान ३५°से. राहील. दुपारी किंवा रात्री पावसाची शक्यता आहे.
नाशिक – किमान तापमान २३°से., कमाल तापमान ३५°से. दुपारी ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता.
नागपूर – किमान तापमान २९°से. आणि कमाल ४१°से. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज.
मुसळधार पावसाचा इशारा :
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. झाडांपासून आणि विजेच्या तारांपासून दूर राहावे. तसेच वादळी वाऱ्यांच्या दरम्यान सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
हेही वाचा :
‘त्या’ चित्रपटातील इंटिमेंट सीनबद्दल करिनाने सगळं सांगितलं, म्हणाली “सगळ्या मर्यादा पार…”
नवरा सीमेवर तैनात इकडं बायकोचे अश्लील फोटो नराधमांचं चीड आणणारं कृत्य
पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण