ना पावसाची भीती, ना उन्हाचं ताण! शरद पवार पेटवणार निवडणुकीचे रान; 22 दिवसांत घेणार तब्बल इतक्या सभा

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन बरोबर महिना उलटला आहे(fire). भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.याच धर्तीवर शरद पवारांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (fire) यांनी यंदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे दिसून येत आहे.अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पवारांनी बंडखोरांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावतानाच त्यांना पाडण्याचा इरादाच बोलून दाखवला होता.त्याची सुरुवात आता लोकसभेच्या निवडणुकीतून होणार आहे.

शरद पवारांनी आपला पाच ते सहा दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावला असून एक एक पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे.त्यातच अजित पवारांच्या निकटवर्तींयांसह भाजप,शिवसेनेत नाराजांकडे विशेष मोर्चा वळवला आहे.

याचसोबत आता पवार राज्यात लोकसभा निवडणुकासाठी सभांचा धडाका लावणार आहे.अवघ्या 22 दिवसांत राज्यभरात तब्बल 50 सभा ते घेणार आहेत.शरद पवारांनी बंडखोरांनी या निवडणुकीत धडा शिकवण्याचा विडाच उचलला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत.

25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.

हेही वाचा :

 “कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्रालयात भीषण आग; कॉम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

खूर्चीवर बसून मोहम्मद शमी करतोय T20 वर्ल्ड कपची तयारी; पाहा Video