“रवी किशन माझे पती”; निवडणुकीपूर्वी भाजप खासदार वादाच्या भोवऱ्यात; मुलगीही आली समोर

संबंधित महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.(mp) या आरोपांवर आणि दाव्यांवर अद्याप रवी किशन यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान ऊर्फ केआरकेनं म्हटलंय की अपर्णा यांच्याकडे मुलीच्या डीएनएचा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट घेऊन त्या कोर्टात न्याय मागणार आहेत.

भोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे (mp)भाजप खासदार रवी किशन चांगलेच अडचणीत सापडले आहेत. निवडणुकीपूर्वी ते एका मोठ्या वादात सापडू शकतात. कारण एका महिलेनं रवी किशनची पत्नी असल्याचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर रवी किशन यांच्याकडून त्यांना एक मुलगी असल्याचाही खुलासा संबंधित महिलेनं केला आहे. या महिलेचं नाव अपर्णा ठाकूर असून रवी किशन यांनी मुलीचा स्वीकार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या महिलेनं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

अपर्णा यांनी सोमवारी लखनऊमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत त्यांनी रवी किशन यांच्याविषयी धक्कादायक खुलासा केला. 1996 मध्ये त्यांनी रवी किशन यांच्यासोबत मुंबईत लग्न केल्याचं म्हटलंय. या लग्नसोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणीसुद्धा उपस्थित होते. आम्हा दोघांची एक मुलगीसुद्धा आहे, असंही अपर्णा यांनी म्हटलंय. रवी किशन यांनी सामाजिकरित्या आपला आणि मुलीचा स्वीकार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर त्यांनी असं नाही केलं तर न्यायासाठी कोर्टाची पायरी चढण्यास तयार असल्याचाही इशारा अपर्णा यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत अपर्णा यांच्यासोबत त्यांची मुलगीसुद्धा होती. तिनेसुद्धा रवी किशन हे आपले वडील आहेत, असा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर ते मला भेटायलासुद्धा यायचे, असंही मुलीने म्हटलंय. “मला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही. ते मला भेटायला थोड्या वेळासाठी यायचे आणि पुन्हा निघून जायचे. ते माझ्यासोबत कधीच थांबले नाहीत. त्यांच्याशी माझी अनेकदा बातचित झाली पण त्यांनी कधीच माझी मदत केली नाही. मला एकदा दहा हजार रुपयांची गरज होती. मी त्यांच्याकडे मागितले तर त्यांनी मला पैसेसुद्धा दिले नाहीत. मला अभिनेत्री व्हायचंय, पण त्यातही ते माझी काहीच मदत करत नाहीयेत”, असे आरोप मुलीने केले आहेत. संबंधित मुलीने अभिनेत्री लारा दत्तासोबत एका चित्रपटात काम केलंय.

अपर्णा यांचा दावा
अपर्णा यांनी सांगितलं की त्यांची भेट रवी किशन यांच्यासोबत 1995 मध्ये झाली. त्यावेळी त्या पत्रकारितेचं शिक्षण घेत होत्या. त्यानंतर वर्षभराने दोघांनी लग्न केलं. अपर्णा यांच्या मते रवी किशन आतासुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र सार्वजनिकरित्या ते या नात्याचा आणि मुलीचा स्वीकार करण्यास तयार नाहीत.

हेही वाचा :

साताऱ्याची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट

लालपरीचा प्रवास महागणार! ‘इतक्या’ रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर

एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅन’चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!