बाथरूमची काच काढून प्रेयसीचा न्यूड व्हिडीओ बनवला, ब्लॅकमेलिंगला कंटाळून…

शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात(bathroom partitions) एक अतिशय खळबळजनक प्रकार घडला. एका तरूणाचे त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचे न्यूड व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा अनन्वित छळ करण्यात आला. प्रियकराच्या या छळाला कंटाळून अखेर त्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तिने थेट फिनाईनल पीत जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने हा प्रकार तिच्या घरातल्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिला वेळीच रोखत तिचा जीव वाचवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल वाल्हेकर असे आरोपीचे नाव असून तो 18 वर्षांचा आहे. त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने तिचा गैरफायदा घेतला. ती मुलगी बाथरूममध्ये(bathroom partitions) असताना कपिलने बाथरूमची काच काढून तिचा न्यूड व्हिडीओ बनवला. नंतर त्याने हाच व्हिडीओ तिला दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

हा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिचा अनन्वित छळ केला. त्याच्या या छळामुळे आणि धमक्यांमुळे ती अल्पवयीन मुलगी खूप त्रासली होती. अखेर तिने यातून सुटकेसाठी स्वत:चंच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने नातेवाईकांमुळे तिचा जीव वाचला.

हे प्रकरण घरी कळल्यानंतर घरच्यांनी तिला धीर दिला आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी कपिल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

भारतातून ‘ईव्ही’ निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ पहिली बहुराष्ट्रीय कंपनी

भाजप आमदाराला गावकऱ्यांच्या विरोध; साहेब आल्या पावली परतले

‘एल क्लासिको’ मॅचआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! तुफान गोलंदाज सामन्यातून बाहेर