राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कारणावरुन कोणी ना कोणी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता बार्शी तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणानेे स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील खडकलगाव येथे ही घटना घडली आहे.

सोमनाथ सुरेश रोंगे (वय ३५, रा. खडकलगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) असे मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयताचे वडील सुरेश रंगनाथ रोंगे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गावातीलच ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे हिने वेळोवेळी सोमनाथ रोंगे याला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला पैसे आणून देत जा, माझ्याकडे नेहमी येत जा, तू जर मला सोडून गेलास तर तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देते, असे म्हणून त्याच्याशी नेहमी वारंवार भांडण करून त्याला मानसिक(suicide) त्रास दिला, ज्योती हिने सोमनाथ याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
तर एकाला कापायला काय हरकत… पुन्हा एकदा बच्चू कडूंचे आमदारांबद्दल ते विधान
वाळवंटाचे जहाज रस्त्यावर उतरले, स्केटिंग शूज घालत मोठ्या तोऱ्यात उंटाने करून दाखवली स्केटिंग… मजेदार Video Viral
बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर…