उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेचा उघडकीस आला आहे. मुंडापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका महिलेवर तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तब्बल आठ महिन्यांपासून बलात्कार (bathroom)केल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितेचा पती दुबईत नोकरीसाठी असताना, आरोपीने या परिस्थितीचा फायदा घेत आधी बाथरूममध्ये(bathroom) छुपे कॅमेरे लावले आणि नंतर त्याच व्हिडीओच्या माध्यमातून महिलेवर ब्लॅकमेल करून वारंवार लैंगिक अत्याचार केले. आरोपीने कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून या काळात महिला भयभीत राहावी यासाठी अत्याचार सुरू ठेवले. पती परतल्यावर पीडितेने आपली आपबीती सांगितली आणि त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि आयटी ॲक्टसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती दिली आहे. पोलीस तातडीने तपास करत असून मोबाईल डेटा आणि डिजिटल पुराव्यांचा अभ्यास करून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा :
तोंडात रॉकेल घेतलं, आगीवर फूंकर मारली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!
माझ्याकडे नेहमी येत जा, तू जर मला सोडून गेलास तर…