हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात?  

शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या चार ते पाच जागांवरील उमेदवारांना भाजपचा विरोध कायम असल्याचं दिसतंय. त्याचमुळे शिवसेनेकडून हिंगोलीतील हेमंत पाटलांची (necks)उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं लक्ष ठेवलेल्या महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यातल्या त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्याकाही उमेदवारांना भाजपचा अजूनही विरोध असून त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी केली जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेल आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी शिंदेंच्या वाट्याला 12 किंवा 13 जागा येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता. तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे. एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने (necks)यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केला नाही.

जी गत हिंगोलीची तीच गत आता हातकणंगल्याची आहे. हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज  आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. 

धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघांमधील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलं. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. महायुतीतील सर्वाधिक वादग्रस्त ठरू शकणारी जागा म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोलीमधून शिवसेनेने हेमंत पाटलांच्या नावाची जरी घोषणा केली असली तरी त्यांना असणारा भाजपचा विरोध मात्र कायम आहे. हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याचा अहवाल असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर भाजप सहजपणे खासदार निवडून आणेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

आता हेमंत पाटलांचं नाव घोषित केलं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना विरोध कायम केला आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत गोंधळ झाल्याचे दिसून आले. हा विरोध इतका आहे की शिवसेनेकडून हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत.

हेही वाचा:

इचलकरंजी महापालिकेचा सार्वजनिक नळ घरात! अधिकाऱ्याकडून कारवाईचा आदेश

महायुतीत शिवसेना नाराज? भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, पण मान्सूनविषयी ‘गुड न्यूज’