UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! बँकेची सेवा ‘या’ दिवशी बंद राहणार

UPI सेवा वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.(services ) देशातील अग्रगण्य खाजगी बँक HDFC बँकेने आपल्या UPI सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 8 जून 2025 रोजी सकाळी 2:30 ते 6:30 या कालावधीत HDFC बँकेच्या UPI आणि काही डिजिटल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. बँकेने हे स्पष्टीकरण दिलं आहे की, ही तांत्रिक देखभाल व सिस्टम अपग्रेडसाठी ही सेवा थांबवली जात आहे. यामुळे भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या, वेगवान आणि सुरक्षित डिजिटल सेवा मिळू शकतील.

या सेवांवर होणार परिणाम, व्यवहार ठरवून करा! :
ATM व्यवहार
डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट्स
क्रेडिट कार्ड बिलिंग
मात्र, खालील सेवा उपलब्ध राहणार नाहीत:

– HDFC बँकेच्या सेव्हिंग्स आणि करंट(services ) अकाउंटशी संबंधित UPI सेवा
– RuPay क्रेडिट कार्डद्वारे होणारे UPI पेमेंट्स
– PhonePe, Google Pay, Paytm सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे व्यवहार

बँकेने ग्राहकांना सूचित केलं आहे की महत्त्वाचे व्यवहार किंवा बिल पेमेंट्स देखभाल कालावधीच्या अगोदरच पूर्ण करावेत, जेणेकरून अडचण टाळता येईल. याशिवाय PayZapp वॉलेट सारख्या पर्यायी पर्यायांचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.(services )HDFC बँक वेळोवेळी आपल्या सिस्टममध्ये सुधारणा करत असते. याआधीही 9 आणि 10 मे रोजीही याच कारणासाठी काही वेळ UPI आणि नेटबँकिंग सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बँकेचा दावा आहे की ही प्रक्रिया ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ डिजिटल अनुभवासाठी अत्यावश्यक आहे. UPI हे डिजिटल व्यवहाराचं प्रमुख माध्यम झालं असून, अशा सेवा बंदीचा थेट परिणाम लाखो ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे 8 जून 2025 च्या पहाटेच्या वेळेत UPI व्यवहार टाळा आणि तुमचं नियोजन आधी करून ठेवा.

हेही वाचा :