Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री!

Oppo ने मंगळवारी 22 एप्रिल रोजी त्यांचा नवीन स्मार्टफोन(smartphone) Oppo K12s चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट व्हेरिअंट आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन 4 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनचं डिझाईन अतिशय कमाल आहे. स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर देण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे स्मार्टफोनचा लूक अगदी क्लासी वाटत आहे.

Oppo K-सीरीजमधील इतर स्मार्टफोन्सप्रमाणे या नव्या डिव्हाईसमध्ये देखील 50-मेगापिक्सल मेन रियर कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. Oppo K12s हा स्मार्टफोन Oppo K13 5G चे रीब्रांडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. Oppo K13 5G स्मार्टफोन कंपनीने भारतीय मार्केटमध्ये लाँच केला आहे. Oppo K13 5G नंतर आता Oppo K12s भारतात कधी लाँच केला जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Oppo K12s ची किंमत
Oppo K12s स्मार्टफोन(smartphone) 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Oppo K12s स्मार्टफोनच्या बेस 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 1,199 म्हणजेच सुमारे 14,000 आहे. 8GB + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,399 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये आहे. 12GB + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये आणि 12GB + 512GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन रोज पर्पल, प्रिज्म ब्लॅक आणि स्टार व्हाइट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनची विक्री चीनमध्ये 25 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Oppo K12s चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट वाला Oppo K12s स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड कंपनीच्या ColorOS 15 स्किनवर चालतो. यामध्ये 6.67-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये हीट डिसिपेशनसाठी 5,700mm स्क्वायर VC आहे.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Oppo K12s मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला, यामध्ये f/2.5 अपर्चरसह 16-मेगापिक्सल सेंसर आहे. फोनमध्ये डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंससाठई IP65-रेटेड बिल्ड आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्स
Oppo K12s साठी कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये 5G, NFC, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये डुअल स्टीरियो स्पीकर्स आणि ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हँडसेट फेशियल रिकग्निशनला सपोर्ट करतो. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल आणि प्रॉक्सिमिटी सेंसर यांचा समावेश आहे.

बॅटरी
Oppo K12s मध्ये 7,000mAh बटरी देण्यात आली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. फास्ट-चार्जिंग फीचरबाबत असा दावा केला जात आहे की, बॅटरी शुन्यापासून 62 टक्क्यांपर्यंत केवळ 30 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकते(smartphone). ही बॅटरी सिंगल चार्जवर 49.4 तासांचा कॉलिंग टाइम आणि मॅक्जिमम 14.9 तासांचा व्हिडीओ कॉलिंग टाइम ऑफर करते.

हेही वाचा :

डी.जी.पी. ते न्यूरो सर्जन उच्च वर्तुळातील शोकांतिका!

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे संघटन तुमच्या दारी उपक्रम

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *