पावसाच्या थंड वातावरणात आता घरीच बनवा टेस्टी आणि चटकदार Veg Frankie

फ्रँकी हा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे जो भारतातच काय तर इतर देशांमध्येही (Frankie)आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. फ्रँकी व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारे बनवली जाते मात्र आज आम्ही तुमच्यासोबत व्हेज फ्रॅंकीची एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. लहान मुलांमध्ये या फ्रँकीची भारी क्रेझ, अशात यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही घरीच हा पदार्थ तयार करू शकता.पावसाळ्यात शक्य तितकं बाहरेच खाणं टाळावं मात्र मनाला मारू नये. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच सोप्या आणि सहज पद्धतीने तयार करू शकता. आतमध्ये मसालेदार बटाट्याची स्टफिंग आणि बाहेरील सॉफ्ट फ्लेकी रोल यांचे मिश्रण चवीला अप्रतिम लागते. यात भाज्या देखील ॲड केल्या जातात ज्यामुळे याला एक पौष्टिक टच मिळतो. शाळेतल्या डब्यात, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासातही हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य
उकडलेले बटाटे मॅश करून – २ मध्यम
गाजर – १ मध्यम, किसलेले
कोबी – १/२ वाटी, किसलेले
कांदा – १ मध्यम, बारीक चिरलेला
काश्मिरी लाल तिखट – १ चमचा
गरम मसाला – १/२ चमचा
चाट मसाला – १ चमचा
हळद – १/४ चमचा
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – २ चमचे, बारीक चिरलेली
तेल – २ चमचे
गव्हाचं पीठ – १.५ कप
तेल – १ चमचा
पाणी – लागेल तसं पीठ भिजवण्यासाठी
शेजवान चटणी
मेयॉनीज
यंदाच्या पावसाळ्यात घरी बनवा(Frankie) कोलकाता स्टाईल Aloo Bonda; चहासोबतचं परफेक्ट कॉम्बिनेशन

कृती
व्हेज फ्रँकी तयार करण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचं पीठ, (Frankie)मीठ आणि तेल एकत्र करून पाण्याने मळून मध्यम सैल पीठ तयार करा
तयार पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा
त्याचे छोटे गोळे करून पोळीप्रमाणे लाटून घ्या आणि तव्यावर थोडं तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या
कढईत तेल गरम करा. त्यात कांदा घालून थोडा परतून घ्या
नंतर त्यात मॅश केलेले बटाटे, हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून परतून घ्या
शेवटी यात कोथिंबीर घालून मिक्स करा आणि तयार स्टफिंग थंड होऊ द्या
आता तयार पराठ्यावर शेजवान चटणी आणि मेयॉनीज लावून पसरवून घ्या, तुम्ही यात तुमच्या आवडीचे सॉस देखील लावू शकता
आता यावर तयार स्टफिंग पसरवा
यावर चिरलेली कोबी आणि गाजर ठेवा
शेवटी यावर चाट मसाला भुरभुरा आणि पराठा रोल करा
तयार रोल गरम तव्यावर भाजून घ्या आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात चीज, किंवा पनीर स्टफिंग घालू शकता
बाहेरच्यापेक्षा घरची फ्रँकी आरोग्यदायी आणि जास्त चवदार असते

हेही वाचा :

भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण