‘या’ देशात 50 टक्के पेक्षा जास्त घेतला जातो Income Tax

कोणत्याही देशात कर हा अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक(economy) असतो. या करांद्वारेच सरकार सार्वजनिक सेवा पुरवतात. ज्याद्वारे समाजाकरिता योजना राबविण्यात येतात. मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या करामध्ये मोठा वाटा हा   आयकराचा असतो. भारतामध्ये आयकराच्या रचनेनुसार  5 ते 30 टक्के कर भरावा लागतो. जुन्या आयकराच्या पद्धतीप्रमाणे  2.50 लाखांच्यावर उत्पन्नावर करांची सुरुवात होते. तर नवीन  3 लाख उत्पन्राच्या अधिक कराची सुरवात होते. प्रत्येक देशात कालांतरांने  आयकराच्या रचनेत बदल केले जातात. असे काही देश आहे ज्यामध्ये उत्पन्राच्या जास्त कर घेण्यात येतो. जाणून घेऊया त्या देशांबद्दल.

फिनलँड

युरोपातील  फिनलँडमध्ये आयकर दर हा उत्पन्राच्या तब्बल  57.3% आहे. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची ही करप्रणाली नागरिकांना उच्च दर्जाचे जीवन मिळेल (economy)याची खात्री देते. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाला  या प्रकारच्या कर प्रणालीचा फायदा होतो.

जपान
जपानी लोकांच्या कष्टाबद्दल आपल्या सर्वांनाच कौतुक असते. येथील ही जनता ही जगातील सर्वाधिक आयकर भरण्यांपैकी एक आहे. येथे आयकराचा दर 55.95% पर्यंत आहे. या करप्रणाली अनेक वेगवेगळे स्लॅब आहेत. मुख्यत:  उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर अधिक कर लावण्यासाठी डिझाइन केली आहे.

डेन्मार्क

डेन्मार्क देशातील आयकराचा  दर हा 55.9% आहे. डेन्मार्कमध्ये प्रगतीशील कर प्रणालीचे अनुसरण केले जाते. या देशात  जास्त उत्पन्न असलेल्या लोकांकडून जास्त कर घेतला जातो.

ऑस्ट्रिया

युरोपातील ऑस्ट्रियामध्ये आयकर दर हा 55% आहे. हा कर महसूल प्रामुख्याने आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह आवश्यक सार्वजनिक सेवांकरिता पुरविण्यात येतो. तेथील नागरिकांचे उच्च दर्जाचे जीवनमान राखण्यासाठी या सेवा महत्त्वाच्या आहेत.

स्वीडन

52.3 % आयकराचा दर हा  स्वीडनमध्ये आहे. या आयकराच्या मुख्य स्रोताद्वारे तेथील सरकार हे  त्यांच्या नागरिकांना आरोग्य सेवा उच्च शिक्षण अशा व्यापक सार्वजनिक सेवा प्रदान करते. त्यामुळे उच्च दर ठेवण्यात आले आहेत.

अरुबा

कॅरिबियन देश असणाऱ्या अरुबा या देशात (economy)वैयक्तिक आयकर दर 52% आहे. अरुबा  हा एक सुंदर बेट आहे. जेथे पर्यटन हे क्षेत्र महत्वाचे आहे.

बेल्जियम

युरोपातील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या बेल्जियममध्ये आयकर दर 50% आहे.  येथील सरकार या उच्च करांच्या सहाय्याने व्यापक सामाजिक कल्याण कार्यक्रमांना समर्थन देते.

जास्त कर घेणे हा अनेकदा वादाचा विषय बनतो. ज्यांचे उत्पन्र जास्त त्यांच्यावर मोठ्या प्रमाणत करांचा बोजा पडतो असे दिसून येते. 140 कोटींहून जास्त लोक असणाऱ्या भारतात केवळ 10 कोटींच्या आसपास करदाते आहेत. 2014 नंतर जवळपास 100 टक्क्यांनी करदात्यांची संख्या वाढली आहे. मात्र ही संख्या यापेक्षा कितीतरी मोठी असणे अपेक्षित आहे.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा